छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): शाह बाजार भागात घडलेल्या हत्या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी आसिफ सय्यद हनीफ उर्फ आसिफ 'रायडर' याला गुन्हे शाखेने अखेर मुंबईतून अटक केली आहे. अटक टाळण्यासाठी नाव बदलून आणि वेशांतर करून राहणाऱ्या या आरोपीला पकडण्यात पोलिसांना तब्बल ८ महिन्यांनंतर यश आले आहे.
३१ ऑक्टोबर २०२५ रोजी शहरातील शाहगंज भागात ही धक्कादायक घटना घडली होती. शाहगंज येथील भाजी विक्रेता समीर खान याचा अन्य विक्रेत्यांशी किरकोळ वाद झाला होता. या वादाचा सूड उगवण्यासाठी आसिफ 'रायडर' आणि त्याच्या साथीदारांनी समीर खान मोटारसायकलवरून जात असताना त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. समीर खान यांच्यावर तलवारीने सलग १७ वार करून अत्यंत निघृणपणे त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी मृत समीर खान यांच्या पत्नी सना कौसर समीर खान यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आसिफचे साथीदार शोएब अन्वर खान उर्फ काला), इस्रार खान, मोहम्मद नासिर उर्फ इट्टा, रा. रशीदपुरा आणि इस्लाम खान
मुंबईत बदलले नाव
▶ मुख्य आरोपी आसिफने थेट मुंबई गाठली. मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या नागपाडा भागात एका ३ फूट अरुंद गल्लीतील घरात तो आपल्या कुटुंबासह राहत होता. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने आपले नाव बदलून 'अनीस' ठेवले होते आणि तेथे तो वेल्डिंगचे काम करून उदरनिर्वाह करत होता. विशेष म्हणजे, आसिफ केवळ नववी नापास आहे, तर त्याची पत्नी उच्चशिक्षित आहे. कोरोनाच्या काळात मोटारसायकलवर धोकादायक स्टंट्स करून त्याने 'रायडर' म्हणून कुप्रसिद्धी मिळवली होती आणि त्याच्यावर आधीही अनेक गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांचे थरारक ऑपरेशन करीमनगर
▶ गुन्हे शाखेचे पोलीस आरोपीचा कसून शोध घेत होते. दरम्यान, अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सामील असलेल्या एका गुन्हेगाराला करीमनगरमध्ये लपवून ठेवण्यात आसिफचा हात असल्याची माहिती उपनिरीक्षक अर्जुन कदम यांना मिळाली. दाट लोकवस्ती असलेल्या करीम नगर भागात त्याला शोधणे अत्यंत आव्हानात्मक होते.
उर्फ अस्लम चौस, रा. शाहगंज यांना ताब्यात घेतले होते. मात्र, मुख्य आरोपी आसिफ रायडर तेव्हापासून फरार होता.
गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दिवस वेशांतर करून त्या भागात पाळत ठेवली. शुक्रवारी रात्री, कानात डूल घातलेला आसिफ रायडर करीम नगर पोलीस चौकीसमोर मोटारसायकलवरून जाताना पोलिसांना दिसला. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाथरकर यांनी त्याला थांबवण्याचा इशारा केला असता, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, आधीच दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला
अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.
तांत्रिक तपास, गुप्त खबऱ्यांकडून मिळालेली माहिती आणि पोलिसांनी दोन दिवस केलेले वेशांतर यामुळे या कुख्यात आरोपीला बेड्या ठोकण्यात यश आले. अटक केल्यानंतर त्याला छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात आले असून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी सिटी चौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सदर धडक कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर आणि सहाय्यक निरीक्षक प्रवीण पाथरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions.